नरखेड: गोठ्यातून लाखोचा प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त; दोघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेने कोंढाळी येथे छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंकज जानबाजी तांदळे (वय ४२) याच्या गोठ्यावर छापा टाकला. १५१.१२ किलो प्रतिबंधित तंबाखू, एक इकोस्पोर्ट कार आणि मोबाईल असा एकूण **८ लाख ४० हजार ६४२ रुपयांचा** मुद्देमाल जप्त करण्यात आले.