रामटेक: गाडगेबाबा सभागृह रामटेक येथे महाराष्ट्र अंनिसची रामटेक शाखा पुनर्गठीत
Ramtek, Nagpur | May 4, 2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेकची शाखा पुनर्गठीित करण्यात आली. नानाभाऊ उराडे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ.कांचनमाला माकडे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. गाडगेबाबा सभागृह गांधी चौक रामटेक येथे चार मे ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आयोजित एका विशेष सभेत केंद्रीय निरीक्षक म्हणून राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे व जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे उपस्थित होते. शाखेचे मुख्य सल्लागार म्हणून जेष्ठ कार्यकर्ता डॉ. प्रा. ओमप्रकाश आस्टनकर यांची निवड करण्यात आली.