शिक्षक दिनानिमित्त जि. प. शाळा, चिचाटी येथे विशेष भेट
“शिक्षक केवळ शिकवत नाहीत; ते व्यक्तिमत्त्व घडवतात, स्वप्नांना दिशा देतात आणि भविष्य घडवतात.”
शिक्षक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक @niketan_ips , अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक पोलीस अधीक्षक, अचलपूर ईशानी आनंद व इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, शिक्षणाला जीवनाशी जोडण्याचा आणि ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच ११२ आपत्कालीन हेल्पलाइनबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🛡️ऑपरेशन कवच
3k views | Amravati, Maharashtra | Sep 5, 2026