रामटेक: रामटेक च्या पेट्रोल पंपावर नो स्टॉक चा बोर्ड; वाहनधारक त्रस्त
Ramtek, Nagpur | May 10, 2026 मागील काही दिवसांपासून रामटेक परिसरातील पाच पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. रविवार दिनांक 10 मे ला सकाळपासूनच एक पेट्रोल पंप सोडला तर चार पेट्रोल पंपावर आडवी दोरी बांधून डिझेल, पेट्रोल नसल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे इंधन भरावयास पेट्रोल पंपावर आलेले वाहन चालक आल्या पावली परत फिरत होते.