नरखेड: नरखेड पोलिसांची कारवाई: बेलोन्यात ५२ पत्त्यांच्या जुगारावर धाड, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरखेड पोलिसांनी मौजा बेलोना शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १७ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून एक केटीएम मोटारसायकल 1४,००० रोख, ५२ ताशपत्ते आणि मोबाईल असा एकूण १,२०,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.