कळमेश्वर: कामठी गोंडखैरी मार्गावर भीषण अपघात, ट्रक चालक केबिनमध्ये अडकला, खडगाव जवळची घटना
कामठी गोंडखैरी मार्गावरील खडगाव जवळ आज एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती चालक केबिनमध्येच अडकून पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कामठी गोमखेडी रोडवर खडगाव परिसरात हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले