जालना: शिक्षकांच्या निधीत 20 वाख 25 हजाराचा अपहार; प्रभारी शिक्षणाधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी तसेच प्राथमिक शिक्षण निधीतील तब्बल 20 लाख 25 हजार 327 रुपयांचा अनधिकृतपणे अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी जालना महानगरपालिकेचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तथा नूतन वसाहत प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सुरेश भानुदास सांगुळे यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.