निफाड - चांदवड मार्गावरील शिवडी येथील मध्य रेल्वे गेट नं १०१ वर दररोज दोन दोन किलोमिटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. रेल्वे गेट उघडताच पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालकच वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
निफाड चांदवड या मार्गावरुन धुळे ते पुणे जाणारी मोठी प्रवासी वाहने व अवजड वाहने हे नियमित जातात. तसेच स्थानिक शेतमाल वाहतुकीची साधने, नोकरदार, विद्यार्थी यांची वाहने यामुळे निफाड चांदवड मार्ग