धुळे: एसटी संप मागे, धुळे जिल्ह्याला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे एक कोटी साठ लाखाचा फटका
Dhule, Dhule | Sep 4, 2024 संपदरम्यान धुळे जिल्ह्यात एसटी महामंडळाचा एक कोटी साठ लाख रुपयांचा महसूल बुडाला. दिवसाला ८० लाख रुपये इतका महसूल बुडाल्याने काही महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली. संपामुळे ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. शहरातून गावी जाणाऱ्यांना खासगी वाहनांचा पर्याय शोधणे भाग पडले.