भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 28 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपी नामे प्रफुल हरिचंद्र भुसारे व महेश नारायण मुत्तलवार यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले