जालना: राखीच्या धाग्यातून जपले नाते,हेल्मेटच्या भेटीतून दिली सुरक्षिततेची हमी!;चंदनझिरा पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
Jalna, Jalna | Sep 4, 2026 नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणार्या पोलिस दलातही स्नेह, आपुलकी आणि बहीण-भावाचे नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण चंदनझिरा पोलीस ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राखीच्या धाग्यासोबतच महिला पोलिस कर्मचार्यांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दैनंदिन पोलिस कामकाज, विविध बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळत असतानाही हा उपक्रम राबविण्यात आला.