मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस 'पेट्रोकार्ड' उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री
26 views | Sindhudurg, Maharashtra | Jul 30, 2026 मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस 'पेट्रोकार्ड' उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात 'कॅशलेस पेट्रोकार्ड उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त, संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, उपस्थित होते.