कळमेश्वर: ब्लिंकेट वेअर हाऊस मधील आंदोलनाला यश, पोलीस मध्यस्थीने कामगार पुन्हा सेवेत
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील केतापार येथील ब्लिंकेट वेअरहाऊसमध्ये ८ जुलै रोजी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी अचानक करण्यात आलेल्या बदली, कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेले निर्णय तसेच कर्मचाऱ्यांशी होत असलेल्या कथित त्रासदायक वागणुकीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले होते.या प्रकरणात कामगारांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, उपस्थित होते