वेंगुर्ला: वेंगुर्ल्यात आधुनिक मत्स्यबीज प्रकल्प, मत्स्य उत्पादकांसाठी मोठा वरदान
वेंगुर्ल्यात सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक मत्स्यबीज प्रकल्पामुळे खेकडा, जीताडा व शिंपळे यांच्या दर्जेदार बीजाची निर्मिती स्थानिक पातळीवर होणार आहे. आंध्र प्रदेशच्या प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तयार झालेला हा प्रकल्प कोकणातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देईल.