रामटेक: तहसील कार्यालय रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न
Ramtek, Nagpur | Apr 25, 2026 आगामी खरीम हंगामात बियाणे व खतांचा तुटवडा भासू नये आणि शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये याकरिता कृषी विभागाने सतर्क रहावे असे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कृषी विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.शनिवार दिनांक 25 एप्रिलला तहसील कार्यालय रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन कृषी विभाग रामटेक द्वारे करण्यात आले होते.