अमरावती: वडूरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चायना मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू,बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वडूरा गावाजवळ कुटुंबसह जाणाऱ्या एका तरुणाचा चायना मांजामुळे गळा कापला गेला होता.या घटनेत त्या तरुणाचा मृत्यू देखील झाला होता.शुभम परमेश्वर पिल्लेवार वय 30 असे त्या मृतक तरुणाचे नाव आहे. 14 जून 2024 रोजी ही घटना घडली होती.या घटनेच्या सहा महिन्यानंतर गुरुवारी 12 डिसेंबर रोजी या प्रकरणात अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी मृतक शुभमच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे,अशी माहिती 12 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.