भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या सात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 30 जुलै रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की वाघा बिअर बार भिवापूर येथे काही इसम जुगार खेळत आहे पोलिसांनी घटनास्थळी धार टाकली असता वैभव रमेश सुरस्कर, बंडू श्रीपतराव नागेश, देविदास रामकृष्ण बोरकुटे, सोमेश्वर नामदेव भजभुजे, आशुतोष अशोक मोरे, किशोर लक्ष्मण सोनकुसरे, रमेश बापूराव देवाळकर यांना जागीच पकडले व त्यांच्याकडून आठ लाख 56 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला