पुण्यात बुलडोझर ॲक्शन! गुंड पाडळे टोळीच्या आर्थिक साम्राज्यावर घाव; 'मातोश्री हॉटेल' जमीनदोस्त...
.
.
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी एक अत्यंत मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२०२६ मधील 'मोक्का' (MCOCA) गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी मनोज पाडुळे (रा. सिंहगड कॅम्पस, पुणे) याच्या टोळीला आर्थिक रसद पुरवणारे बेकायदेशीर 'मातोश्री हॉटेल' आज बुलडोझर लावून पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे.सिंहगड कॅम्पस परिसरातील हे हॉटेल केवळ बेकायदेशीर नव्हते, तर ते या भागातील 'क्राईम हॉटस्पॉट' (Crime Hotspot) बनले होते. या ठिकाणी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राबता असायचा आणि या हॉटेलच्या माध्यमातून फरार आरोपी मनोज पाडुळे व त्याच्या टोळीला आर्थिक स्त्रोत (Financing) पुरवला जात असल्याचे तपासात समोर आले होते. या हॉटेल आणि परिसरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आणि राड्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले.कॅम्पस परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी ही संयुक्त बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या 'सिंघम' स्टाईल कारवाईमुळे पुणे शहरातील इतर गुन्हेगारी टोळ्यांचे आणि भाईंचे धाबे दणाणले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांची आणि गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांची मालमत्ता अशीच उद्ध्वस्त केली जाईल, असा कडक संदेश या कारवाईतून पुणे पोलिसांनी दिला आहे.
.
.
.
#PunePolice #BhartiVidyapeethPolice #SinhagadCampus #BulldozerAction #PuneCrime #Mcoca #MCOCA #BreakingNewsPune #CrimeHotspot #PuneNews #LawAndOrder #maharashtrapolicebharti
Haveli, Pune | Jul 2, 2026