कुही: वेलतुर-प्रतापपूर शेतशिवारात वाघाने केली महिलेची शिकार
Kuhi, Nagpur | Mar 28, 2026 ग्रामीण भागात असलेल्या वेलतुर-प्रतापपुर शेतशिवारात शेतात काम करायला गेलेल्या 65 वर्षीय महिलेची वाघाने शिकार केल्याची घटना 28 मार्च शनिवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.निर्मला श्रीपत गभने वय 65 वर्ष राहणार वेलतुर असे मृतक महिलेचे नाव आहे.