भिवापूर: उपोषणाचा चौथा दिवस, माजी आमदार सुधीर पारवे यांनी घेतली उपोषण करण्याची भेट
चिखली ते भिवापूर (८ किमी) या अत्यंत खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने सरपंच प्रणाली गारघाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत.आज सकाळी माजी आमदार सुधीर पारवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. चिखली येथून दूध वाहतूक करणारे, शेती कामगार तसेच शाळकरी मुले यांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखली ते भिवापूर मार्गावर रस्त्याची गिट्टी उखडल्यामुळे सायकल व दुचाकी वाहनांचे टायर वारंवार पंक्चर होत आह