हातकणंगले: रुईत जनावरांच्या गोठ्याला आग, दोन म्हशी जखमी
रुई (ता. हातकणंगले) येथे रघुनाथ पाटील यांच्या गोठ्यात लागलेल्या आगीत दोन म्हशी जखमी झाल्या. धुराडी करताना ठिणगी उडून आग लागल्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी उरलेल्या जनावरांना बाहेर काढून जीवितहानी टाळली.