कळमेश्वर: कळमेश्वर नगर परिषद कार्यालयाला भीषण आग, संपूर्ण दस्तऐवज जळून खाक
आज सकाळी कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयात अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की, कार्यालयाच्या इमारतीतून धुराचे प्रचंड लोट निघत असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी आग कशाने लागली याची कारण अद्याप करून आलेले नाही. अग्निशमन दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु मालमत्तेचे लाखोंची नुकसान झाले