टीबी व पॅलिएटिव्ह केअर रुग्णांची आरोग्य तपासणी
भजेपार येथे 'आयुष्यमान आरोग्य मंदिर'तर्फे रुग्णांच्या भेटी
1.7k views | Salekasa, Gondia | Feb 19, 2026 सालेकसा : ग्रामीण भागातील नागरिकांना घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने, प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येत असलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर, भजेपार च्या वतीने विशेष आरोग्य तपासणी व गृहभेटी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, टीबी रुग्ण आणि नवजात बालकांची विशेष काळजी घेण्यात आली. या उपक्रमांतर्गत आरोग्य पथकाने गावातील पॅलिएटिव्ह केअर (दीर्घ काळ आजाराने ग्रस्त ) भेट देऊन औषधोपचार करण्यात आला