रामटेक: मनसर उडान पुलाला पडला खड्डा,
काँक्रीट, डांबर उखडून लोखंडी सळाखी आल्या बाहेर, निकृष्ट दर्जाच्या कामाची खुलली पोल
Ramtek, Nagpur | Jul 26, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वाहनांचा अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे. या मार्गावर जबलपूरकडून नागपूरकडे येणाऱ्या लेनवर मध्यभागी मोठा खड्डा पडून डांबर व काँक्रीट उखडून लोखंडी सळ्या बाहेर दिसत आहेत. एवढ्या महत्त्वाच्या वर्दळीच्या या रस्त्यावर असा खड्डा रविवारी वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.