रामटेक: पोलीस निवासची दुर्दशा दूर करण्यासाठी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग रामटेक सरसावले
Ramtek, Nagpur | Apr 7, 2026 राधाकृष्णन वार्ड येथील पोलीस कॉर्टरची अत्यंत दुर्दशा झाली असून ते आता दुरुस्ती करण्याच्या पण लायकीचे राहिलेले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याद्वारे सांगण्यात आले मात्र यामुळे कॉर्टर मागील भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 7 एप्रिलला याकडे लक्ष वेधले असता नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन,सभापती विश्वास पाटील, वार्डाच्या नगरसेविका सौ सुरेखा माकडे,माजी नगरसेवक अनिल वाघमारे, कनिष्ठ अभियंता यांचे सह स्वच्छता अधिकारी यांनी स्थळाची पाहणी केली व ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.