अकोल्यात भीषण अपघात अकोल्यातील दक्षता नगर परिसरात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. वेगात असलेल्या फोर व्हीलरने दोन दुचाकींना जबर धडक दिली. अपघातात सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमधील कर्मचारी अतीश बवासकार यांच्यासह भगतवाडीतील दोन सगे भाऊ मोहम्मद ज़िहान आणि मोहम्मद इमरान गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात करणारा चालक कमलेश महेश्वरी हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची माहिती आहे.