रामटेक: खवासा परिसरात कंटेनरला लागली आग
Ramtek, Nagpur | Apr 17, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर देवालापारच्या पुढे असलेल्या खवासा शिवारात एका कंटेनर चे टायर निकामी होऊन कंटेनरला आग लागल्याची घटना सतरा एप्रिल ला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली. कंटेनर चालकाने प्रसंगावधान साधून ट्रक नियंत्रित केला.इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.