नरखेड: जलालखेडा पोलिसांची कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर जप्त, ३ आरोपींना अटक
Narkhed, Nagpur | May 23, 2026 अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, जलालखेडा पोलिसांना जाम नदीच्या पात्रातून रेतीची चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नदी पात्रात छापा टाकला असता, दोन ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करून ती भरली जात असल्याचे आढळून आले.