शिवसेना पक्षाच्या कामगिरीवर आणि नेतृत्वावर विश्वास टाकत म्हसळा तालुक्यातील खारगाव बु. येथील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी दत्तात्रेय धर्मा कांबळे, दामोदर मालू कांबळे, काशिनाथ लक्ष्मण कांबळे, गणेश भिकू म्हात्रे, रामजी कानू भाईदे, कमलाकर धर्मा भायदे, हरिश्चंद्र भाऊ गाणेकर, दत्ता काशिनाथ कांबळे, सुशील शांताराम सुभेदार, गोपीनाथ महादू सावंत, श्रीधर तांबे. यांच्यासह अनेक युवकांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.