सेलू: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ; ४४०० क्विंटल सोयाबीनची आवक
Seloo, Wardha | Oct 16, 2024 सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटा पूजन करून ता. 16 बुधवारला दुपारी 1 वाजता सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती प्रमोद आदमणे, संचालक रेणूकाताई कोटंबकर, सतीश धोपटे, काशिनाथ लोणकर, संदिप वाणी, सचिव महेंद्र भांडारकर, मुकेश ढोक, किशोर राऊत, अडते, व्यापारी आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.