रामटेक: न्यू तोतलाडोह येथे वादळी वाऱ्याने विद्युत खांब पडले
Ramtek, Nagpur | May 13, 2026 रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल देवलापार क्षेत्रातील न्यू तोतलाडोह गाव परिसरात बुधवार दिनांक 13 मे ला दुपारी अचानक वातावरणात बदल होत वादळी पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग एवढा अधिक होता की या वादळी वाऱ्याने या गावातील विद्युत खांब खाली पडले. तसेच काही झाडे उन्मळून पडली, तर काही झाडांच्या फांद्याही तुटून खाली पडल्या. हे विद्युत काम गावाच्या अंतर्गत रस्त्यावर पडले. विद्दूत ताराही जमीनदोज झाल्याने विद्दूत पुरवठा खंडित झाला होता.