यवतमाळ.. यवतमाळ तालुक्यातील दिघी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून युवकांनी महिलेवर लोखंडी पट्ट्याने वार केले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बाबभूळगाव पोलीस ठाण्यात युवकाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महानंदा चांदेकर असे मृत महिलेचे नाव आहे तर तिच्या शेजारीच राहणाऱ्या युवक पूर्वेज पारधी असे आरोपीचे नाव आहे.