‘पोलीस दीदी’ला तरुणाची कानशिलात! गस्तीदरम्यान महिला पोलिसावर हल्ला, आरोपी अटकेत
बिहारच्या पाटणा येथील रामकृष्ण नगर परिसरात गस्त घालत असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर तरुणाने कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक पातळीवर या महिला अधिकाऱ्याला ‘पोलीस दीदी’ म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला अधिकारी स्कूटरवरून गस्त घालत असताना ही घटना घडली. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर रामकृष्ण नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रदीप नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
🚨 ‘पोलीस दीदी’ला तरुणाची कानशिलात!
👮 गस्तीदरम्यान महिला पोलिसावर हल्ला
🎥 संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद
🚔 महिला पोलिसाला मारहाण; आरोपी अटकेत
#Patna #BiharPolice #PoliceDidi #RamkrishnaNagar #CCTV #PoliceNews #CrimeNews #ViralVideo #BiharNews #BreakingNews