दरोड्याच्या गुन्ह्यात कल्याण तालुका पोलिसांची धडक कारवाई; चार आरोपी जेरबंद!
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा रचत चौघांना घेतले ताब्यात
कल्याण : दरोड्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींना जेरबंद करण्यात कल्याण तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत चौघांना ताब्यात घेतले.
कल्याण तालुका पोलीस ठाण्यात CR नंबर 686/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 309(9) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चारही आरोपींना ताब्यात घेतले. कल्याण तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करत असून, तपासादरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kalyan, Thane | Oct 4, 2026