'गजब' मदत अन् शेतकऱ्याची थट्टा! पत्नीला औताला जुंपणाऱ्या काशिनाथ गायकवाडांना प्रशासनाने दिला आजारी बैल; उपचाराचा बोजा खांद्यावर...
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याने पैशांअभावी त्यांनी आपल्या पत्नीलाच औताला जुंपून शेताची मशागत सुरू केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने 10 जून रोजी तातडीने त्यांना एक बैल दिला. मात्र, प्रशासनाचा हा कारभार किती 'गजब' आणि संवेदनाहीन आहे, याचा प्रत्यय अवघ्या दोन दिवसांतच आला आहे.
मदतीचा मोठा गाजावाजा करत पशुसंवर्धन विभागाने दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतात काम करताना खाली बसला आणि त्याने मान टाकली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता हा बैल गंभीर आजारी असल्याचं समोर आलं. परिणामी, संकटग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी आता त्या आजारी बैलाच्या उपचाराचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
.
.
.
#Latur
#FarmerCrisis
#MaharashtraGovernment
#SocialMediaViral
#JusticeForFarmers
#SaveOurFarmers
#FarmerSupport
Haveli, Pune | Jun 12, 2026