सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगांव (खुर्द) शिवारात शेतात ओलितासाठी ठेवलेले दहा प्लास्टिक स्प्रिंकलर पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास घडला असून याबाबत गजानन रामभाऊ बुधवारे (रा. वडगांव खुर्द) यांनी ता. ३ बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.