कळमेश्वर: नगरपरिषदेतील कामगारांच्या आंदोलनाला यश, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार 634 व 681 रुपये रोजंदारी
कचरा सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आंदोलनानंतर सफाई कर्मचाऱ्यांना आता दररोज ६३४ रुपये आणि ६८१ रुपये इतकी रोजंदारी मिळणार असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे.या निर्णयामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याचे स्वागत केले