आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केली आहे. कोणताही आदेश नसतांना नियमांना बगल देत हेतुपरस्पर काही हेकेखोर मुख्याध्यापकांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी केले आहे, त्याचबरोबर मागील चार महिन्यांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते.