कळमेश्वर: दहेगाव येथे विहिरीत पडून गोमातेचा मृत्यू, ग्रामस्थांच्या तत्परतेने मदत कार्य पूर्ण
वार्ड क्रमांक 2 परिसरात एका विहिरीमध्ये गोमाता पडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रयत्नांनंतर गोमातेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण मदतकार्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी एकजुटीने व तत्परतेने सहभाग नोंदवला.