रामटेक: जंतर मंतर दिल्ली येथे युवक युवती विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ रामटेक येथे निघाला निषेध मार्च
Ramtek, Nagpur | Jul 23, 2026 तथाकथीत नीट पेपर फुटी सोबतच देशाची शिक्षण व्यवस्था, परीक्षा व्यवस्था सुरळीत करणे व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधुराचा मारा केला. या दडपशाही विरुद्ध रामटेक येथे तेवीस जुलैला सायंकाळी सहा वाजता डॉ. आंबेडकर चौक ते गांधी चौक रामटेक पर्यंत निषेध मार्च काढण्यात आला.