रामटेक: पोलीस लाईन अंबाळा परिसरातून सर्पमित्र सागर धावडे याने केला अजगराचा रेस्क्यू
Ramtek, Nagpur | Aug 3, 2026 पोलीस लाईन अंबाळा रामटेक परिसरात एका सात फूट लांबीच्या अजगराचा सर्पमित्र सागर धावडे याने सुरक्षितपणे रेस्क्यू करून परिवार वासियांना भयमुक्त केले. परिसरात हा अजगर वारंवार दिसल्याने परिसरातील नागरिकात भयाचे वातावरण होते. तीन ऑगस्टला सकाळी हा अजगर दिसल्या नंतर नागरिकांनी सर्पमित्र सागर धावडे यास बोलाविले. नाना चांदेकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला पोलीस क्वार्टर परिसरात अजगर आढळला. त्याचा सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आला.