माहूर: 'टीबी मुक्त भारत अभियाना'अंतर्गत रुग्णांचे समुपदेशन व मार्गदर्शन
796 views | Nanded, Maharashtra | Oct 14, 2026 माहूर (नांदेड): माहूर येथे 'टीबी मुक्त भारत अभियाना'अंतर्गत आरोग्य स्वयंसेवकांमार्फत टीबी रुग्णांचे प्रत्यक्ष समुपदेशन करण्यात आले. या मोहिमेत रुग्णांना वेळेवर नियमित औषध घेणे, चांगला आहार ठेवणे आणि लहान मुलांपासून संसर्ग दूर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच TrueNat तपासणीसाठी सकाळी अचूक थुंकी नमुना देण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. टीबी निर्मूलनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.