पुण्यात मुलांच्या मधुमेहावर ‘खेळत-खेळत’ उपचार; स्वीटलिंग्ज सेंटरतर्फे विशेष अभियान
जागतिक मधुमेह दिन आणि बालदिनानिमित्त पुण्यात लहान मुलांमधील मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. स्वीटलिंग्ज सेंटरतर्फे १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या उपक्रमात ‘टाइप १ डायबिटीस’ असलेल्या मुलांसाठी विशेष उपचार आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा खाडिलकर यांनी या अभियानाची माहिती दिली. मुलांना खेळाच्या माध्यमातून मधुमेहाचे व्यवस्थापन, उपचार आणि आरोग्यविषयक सवयी समजावून सांगण्यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे.
स्वीटलिंग्ज सेंटरमध्ये सध्या टाइप १ मधुमेह असलेल्या ८५० हून अधिक मुलांची काळजी घेतली जात आहे. मुलांमध्ये मधुमेहाबाबत जागरूकता वाढवणे आणि उपचारांबरोबरच त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
#DiabetesDay #ChildrensDay #Type1Diabetes #PuneNews #SweetlingsCe
Pune City, Pune | Nov 14, 2026