रामटेक: लोधा येथे गोठ्यात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू
Ramtek, Nagpur | May 17, 2026 शनिवार दिनांक 16 मे च्या रात्री रामटेक तालुक्यातील काही ठिकाणी मेघ गरजेने सह वादळी पावसाला सुरुवात झाली प्रचंड वारा वादळ व मेघगर्जनेमुळे वातावरण भयावर झाले होते अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे कळते शेतकऱ्यांची ही नुकसान झाले अशातच देवलापार जवळच्या लोधा येथील गौतम ढोबळे यांनी गोठ्यात बांधलेल्या एका म्हशीचा विज पडून मृत्यु झाल्याची घटना शनिवार दि. 16 मे च्या रात्री 11.30 वा च्या दरम्यान घडली.