मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाला गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि पवन हंस हेलिकॉप्टरच्या समन्वयातून तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर प्रकृती झालेल्या श्री. शामसुंदर नरोटी (वय 35) यांना भामरागड येथून हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे.
आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. वेळेत उपचार हेच जीव वाचवू शकतात.
गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #EmergencyResponse #HelicopterRescue #Bhamragad #Laheri PublicSafety DisasterResponse Healthcare MaharashtraPolice CitizenFirst
59 views | Gadchiroli, Maharashtra | Jul 31, 2026