गडचिरोली पोलीस दलामार्फत “एक युद्ध नशे के विरुद्ध” अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे, व्यसनाची प्राथमिक लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी समुपदेशन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शाळा व महाविद्यालयांमध्ये अँटी ड्रग कमिटी, अँटी ड्रग सर्व्हेलन्स स्कॉड, गोपनीय तक्रार पेटी, तसेच क्रीडा, निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन केले की, “निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला प्राधान्य द्या व अंमली पदार्थांपासून कायम दूर राहा.”
#GadchiroliPolice #EkYudhNasheKeViruddh #NashaMuktBharat2047 #DrugFreeYouth #SayNoToDrugs
51 views | Gadchiroli, Maharashtra | Jul 30, 2026