नागपूर ग्रामीण: जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.