नागपूर ग्रामीण: गुमथळ्यात वन्य प्राण्यांची दहशत? गोठ्यातील ४ शेळ्यांचा गूढ मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बैलवाडा गावाच्या शेजारीच असलेल्या गुमथळा येथे एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. गावातील शेतकरी धनराज दूधकवळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या १० शेळ्यांपैकी ४ शेळ्यांचा मृत्यू झाला असून, ही घटना बिबट्याच्या हल्ल्यामुळे घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धनराज दूधकवळे यांचे घर गावाला लागूनच असून तिथेच त्यांचा गोठा आहे. रात्रीच्या वेळी गोठ्यात १० शेळ्या बांधलेल्या होत्या.