कळमेश्वर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू, कळमेश्वर काटोल बायपास वरील घटना
कळमेश्वर काटोल बायपास वरील एमआयडीसी चौक परिसरात गुरुवार दिनांक 9 एप्रिल रात्री सव्वादहा वाजता च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली ठाणसिंग प्रतापसिंग मरकाम असे मृतक दुचाकी चालकाचे नाव असून मृतक आष्टी गावांमध्ये मेंढे यांच्या शेतात राहत होता कळमेश्वर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अज्ञात वाहक चालकाचा पोलीस शोध घेत आहे