जालना: जालना स्थानकावर अल्पवयीन मुलगी पालकांच्या ताब्यात; प्रवासी आणि बालसुरक्षेत नांदेड विभागाची तत्परता
Jalna, Jalna | Sep 8, 2026 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी सुरक्षा, बालसुरक्षा तसेच प्रवाशांच्या मौल्यवान सामानाच्या सुरक्षित परतफेडीबाबत सतर्कता आणि तत्परतेचे उदाहरण निर्माण केले आहे. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, बाल हेल्पलाईन तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून विविध घटनांमध्ये अल्पवयीन मुलांना सुरक्षित ताब्यात देण्यात आले. तसेच प्रवाशांच्या खिशातील वस्तू चोरण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. मंगळवार दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता रेल्वेकडून ही माहिती दिली.